केंद्र सरकार कडुन कोविड-19 लसीकरणाच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन

केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहण्याचं सांगितलं आहे.
पीआयबीने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून असल्याचा दावा काही लोकांकडून करण्यात येत आहे. फसवणूक करणारे, वरिष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी त्यांना कॉल करतात आणि आधार कार्ड, ओटीपीसारखी माहिती त्यांच्याकडून घेत आहेत.परंतु हा फसवणूकीचा प्रकार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या नावाने आलेल्या कोणत्याही कॉलवर तुमचा आधार कार्ड आणि ओटीपी नंबर शेअर करू नका.असे आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button