आर.टी.ओ.कार्यालय व एजंट आणि अधिकारी च्या बेबनशाही विरोधात २६ जानेवारीला उपोषण
रत्नागिरी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करत असणारी नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज यानी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी व येथे काम करत असणारे अनधिकृत एजंट आणि बेजबाबदार पणे वागत असलेल्या अधिकारीच्या विरोधात २६ जानेवारी ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसत असल्याचे निवेदन दिले आहे. आर.टी.ओ.कार्यालयाच्या कर्मचारी वर्गाकडून वाहन चालकांना तुच्छ लेखले जात असून अपुरा कर्मचारी वर्गाचे फटका ही जनतेला बसत आहे.येथे असणारे चौकशी कक्ष मृत अवस्थेत असून शो पीसचे माॅडेल बनवून ठेवण्यात आले आहे.या चौकशी कक्षात कोणीच कर्मचारी माहीती देण्यास उपलब्ध नसतो.कार्यालयात ज्या सेवा द्यायला हवेत त्याचे अर्ज इतर जिल्ह्यातील कार्यालयात मोफत मिळतात पण रत्नागिरी त्या कार्यालयात कोणतेच अर्ज उपलब्ध नाहीत.ते बाहेर असलेल्या एजंटच्या गाडीतून दुप्पट पैसे मोजून घ्यावे लागतात.नागरिकांच्या बसण्याच्या जाग्यावर एजंट लोक टाण मारूण बसलेत.जसे काय प्रत्येकाला आर.टी.अधिकारी यांना त्यांना तेवढी जागा नावावर करून दिसल्यासारखे ते वागतात.कार्यालयाच्या महत्वाची कागदपत्रे ज्या ठिकाणी ठेवलेली आहेत त्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीला जाण्यास मनाई आहे मात्र कार्यालयात सात बारा नावावर असल्यासारखे वावरत असणारे एजंट त्याच खोलीत कसे काय जावून गोपनीय अहवाल हाताळतात हा प्रश्न निर्माण झालाय? यांना कार्यालयीन दस्तावेज हाताळण्याचे अधिकार दिले कोणी ? लायसन्स,पासिंग,परमिट,
सर्व प्रकारचे रीनीव्हल,असे अनेक सेवा येथून देता येतात.मात्र त्याची शासकीय फी १००० च्या आत आहे मात्र हे एजंट लोक लायसन्स काढायचे असतील तर ७ ते ८ हजार रुपयांची लूट करतात.वरचे जास्त पैसे कसले विचारणा केली असता साहेबांना द्यावे लागतात.असे सांगितले जाते.मग हा जास्त पैसे घेणारा साहेब कोण?याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.कर्मचारी वर्गाकडे एखादे कागद स्वतः संम्मीट करायला गेलात तर एजंट कोण? असा सवाल केला जातो.जर एखादा व्यक्ती स्वतः काम करत असेल मग अधिकारी व कर्मचारीला एजंट कश्यासाठी? आर.टी.ओ कार्यालयात जनतेची खुले आम लुट सुरू आहे मात्र यांचा भांडा फोडण्यासाठी सर्व सामाजिक संघटना एकवटल्या असून यांच्या बेबनशाहीला विरोध करण्यासाठी सर्व लोक संघटीत होत आहेत.
रत्नागिरी आर.टी.ओ.चे मोठ-मोठे सुरू असलेले प्रताप लवकरच बाहेर पडणार आहेत.जनतेची होणारी पिळवणूक व आर.टी.ओ.तून एजंट मुक्ती साठी २६ जानेवारी ला जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.या उपोषणाला कारभाटलेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे संगमेश्वर सरचिटणीस राजेंद्र पोमेंडकर, कॉग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन, ज्येष्ठ पत्रकार वहब दळवी, कॉग्रेस चिपळूणचे नेते शकील तांबे,समविचारी मंचचे संस्थापक बाबा ढोले, पर्यटन संघटनेचे राजु भाटलेकर, पत्रकार उदय पवार, धनाजी भांगे, न्यू. व्हिजन संघटनेचे अध्यक्ष अभिजित किंजले, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष जाहिदशेठ खान, अनिसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पत्रकार मुजीब खान,युवा संघटनेचे प्रमुख दानिश बोट, आदर्श प्रतिष्ठानचे कार्यध्यक्ष सय्यद मुल्ला, सरचिटणीस विनायक खातू,हरीभाई गुरव, दिनेश पाचकले, आदी सह अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com