नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करून त्याऐवजी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजची उभारणी करावी -युयुत्सु आर्ते
नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करून त्याऐवजी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजची उभारणी करावी असे मत जनता दलाचे जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी व्यक्त केले आहे.
जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, नाणार रिफायनरी उभारल्यास प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कोकणचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून त्याला जिल्हावासीयांनी विरोध करावा असे आवाहन युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. रिफायनरी प्रकल्प जिल्ह्यातून हद्दपार व्हावा अशी भूमिका पर्यावरणप्रेमी संस्थेच्या बैठकीत आर्ते यांनी मांडली आहे.
www.konkantoday.com