कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते नागपूर या मार्गावर नियमित गाडी सुरू करण्याची मागणी
कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते नागपूर या मार्गावर नियमित गाडी सुरू करावी, अशी मागणी दापोलीतील वैभव बहुतुले यांनी प्रवाशांच्या वतीने रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली ही महत्त्वाची ठिकाणे असून ती वेगाने विकसित होणारी शहरे आहेत. दापोलीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत. कोकण कृषी विद्यापीठात नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे.त्यामुळे ही गाडी सुरू झाल्यास या सर्वांना त्याचा फायदा होऊ शकणार आहे
www.konkantoday.com