कोकणचा विकास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती -शरद पवार
कोकणचा विकास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती अभ्यास करत असून,या समितीने कोकणात विकासाच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत (सायन्स टेक्नॉलॉजी) घेऊन काही केंद्र उभी होऊ शकतात. असा सल्ला दिला आहे. त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ठेवला जाईल आणि त्यातून कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.
शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असतना काहि काळ आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिटयमूटला भेट दिल्यानंतर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
www.konkantoday.com