
आरक्षण करूनही रेल्वेत शिरायला जागा नाही, खेड स्थानकात प्रवाशांमध्ये धक्काबुक्की,रोह्यामध्ये चिपळूण दिवा रेल्वे रोखली
गौरी गणपतीचा सण आटोपल्यानंतर कोकणातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी मुंबईकडे निघाले आहेत कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व रेल्वे गर्दीने भरून गेल्या आहेत स्थानकात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी मुंबईला जाण्यासाठी दाखल झाल्यानंतर आधीच्या स्थानकातून खचाखच भरून आलेल्या ट्रेनचे दरवाजा न उघडल्याने प्रवासी संतप्त झाले जबलपूर कोईमतूर एक्सप्रेसमधे चढताना या ट्रेनमधील आतील प्रवासी आणि प्लॅटफॉर्ममधील प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाल्याची घटना झाली त्याही परिस्थितीत मुंबईला जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी ट्रेनच्या दरवाजाला धोकादायक परिस्थितीत लोंबकळत प्रवास केला दररोज रोहा रेल्वे स्टेशनवरून रोहा दिवा पॅसेंजर सायंकाळी चार वाजता सुटते मात्र गणेशोत्सवात ही रेल्वे रोहा स्थानकावर न सोडता चिपळूणवरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला परिणामी ही रेल्वे चिपळूणवरून रोहा स्थानकात भरून आल्याने राेह्यातील प्रवासी वर्गाला जागा मिळाली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रोहा दिवा पॅसेंजर रोखून धरली माणगाव रेल्वे स्थानकातदेखील जबलपूर एक्स्प्रेस समोर चाकरमान्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल्वे रोखून धरली या रेल्वेतील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत त्यामुळे सूरत वापी येथे रिझर्व्हेशन तिकीट घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे मध्ये चढता आले नव्हते शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून यातून मार्ग काढून प्रवाशांची व्यवस्था केली
www.konkantoday.com