लांजा येथे गवंडीकाम करणाऱ्या कामगाराचा तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू
लांजा तालुक्यातील इंदवटी येथील राहणारा संजय जाधव हा गवंडी च्या हाताखाली मजुरीचे काम करत होता २१ डिसेंबर रोजी तो लांजा येथे कामावर गेला असता कामाच्या ठिकाणी त्याला चक्कर आल्याने तो तिसर्या माळ्यावरुन खाली जमिनीवर पडला हाेता त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता त्याला प्रथम रत्नागिरी येथे व त्यानंतर मुंबई येथे जे जे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला
www.konkantoday.com