महिपतगडाचा विकास व्हावा आणि याला क दर्जाच्या पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु
रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड किल्ल्याला नवी झळाळी मिळाल्यानंतर आता संगमेश्वर तालुक्यातील कुंडी गावाजवळील जवळील महिपतगडाचा विकास व्हावा आणि याला क दर्जाच्या पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत.आज या गडाचा प्रत्येक भाग ढासळू लागल्यामुळे तो हिंदवी स्वराज्याचा मूक साक्षीदार बनून राहिला आहे. या गडाच्या विकासासाठी निवेखुर्द ग्रामपंचायतीने ९ कोटी ८५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव गट विकास अधिकारी संगमेश्वर यांना सादर केला आहे.
www.konkantoday.com