
कोसबी नळपाणी योजनेच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आकस्मिक भेट दिली
चिपळूण (रत्नागिरी) : अपांगे वाडीने स्वतः बनवलेली खासगी पाणीयोजना उत्तम चालते, मग सरकारी योजना का अपयशी ठरतात याचा अभ्यास करा, तशा छोट्या योजना गावागावांत राबवा. मोठ्यांना फाटा द्या, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत वाडीवाडीत घराघरांत फिरून त्यांनी लाभार्थींकडून माहिती घेतल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना घाम फुटायचीच वेळ आली होती.
डॉ. जाखड यांनी कोसबी नळपाणी योजनेच्या चौकशीसाठी आकस्मिक भेट दिली.
www.konkantoday.com