
स्वस्त दराने कलिंगड विकल्याच्या रागातून प्रौढाला लोखंडी सळईने मारहाण
स्वस्त दराने कलिंगड विकल्याच्या रागातून प्रौढाला लोखंडी सळईने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अंकुश वासुदेव म्हात्रे रत्नागिरी), मिथून शिंदे , आकाश ढाले संशयिताची नावे आहेत. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रत्नागिरी ते कुवारबाव रस्त्यावर रेल्वेब्रीजच्या अलीकडे फळाच्या स्टॉलजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ नारायण म्हात्रे यांचे व संशयित यांचे कलिंगडाचे दुकान आहे.एकनाथ म्हात्रे कलिंगड स्वस्त विकत विकतात याचा राग धरून संशयितानी मारहाण केली
www.konkantoday.com