
एसटी हे केवळ प्रवासाचे माध्यम नाही तर समाजाच्या विकासात एसटीचे महत्त्वाचे योगदान -जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग
एसटी हे केवळ प्रवासाचे माध्यम नाही तर समाजाच्या विकासात एसटीचे महत्त्वाचे योगदान आहे. चालकांनी मद्यप्राशन करून गाडी चालवू नये तसेच भरधाव वेगानेही गाडी चालवू नये. वाहतूक सुरक्षिततेबाबत एसटी आणि पोलिस एकत्र येऊन यापुढे उपक्रम राबवू. असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.
सोमवारी राज्यभर एसटीच्या ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ या सुरक्षितता मोहिमेचे सोमवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. शहरातील माळनाका येथील विभागीय कार्यालयातही या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे, वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे, विभागीय वाहतूक नियंत्रक सुनील भोकरे, यंत्र अभियंता चालन प्रमोद जगताप, आगारप्रमुख अजय मोरे, अनिल मेहत्तर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
www.konkantoday.com