रत्नागिरी जिल्ह्यातील पंधरा बंदरांच्या विकासाचा प्रस्ताव सादर
केंद्र शासनाने बंदरांसह मासळी उतरविण्यासाठीच्या भागांच्या विकासाची योजना जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दोन बंदरे, मासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचा समावेश असल्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील हर्णै, राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या बंदरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आंबोळगड, हेदवी, बुधाळ, पालशेत, असगोली, दाभोळ, पाजपंढरी, आंजर्ले केळशी, वेसवी, बाणकोट येथे मासळी उतरविण्याची केंद्रे नव्याने तयार केली जाणार आहेत.
www.konkantoday.com