
गणेशगुळे येथील प्रगत आंबा बागायतदार शशिकांत बाबू शिंदे यांच्या हापूस आंब्याच्या पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला रवाना
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील प्रगत आंबा बागायतदार शशिकांत बाबू शिंदे यांनी या मोसमातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला पाठवून पहिला आंबा पेट्या पाठवण्याचा मान मिळवला. पेटी प्रथम पाठवण्याचा मान सलग सहाव्या वर्षी मिळवला. पावस परिसरात हापूस आंबा कलम लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
www.konkantoday.com