
रत्नागिरी जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार,आज मतमोजणीत
रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची आज सकाळपासून मतमोजणी सुरू होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक
रिंगणात असलेल्या उमेदवारांचा निकाल आजसोमवारी फुटणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी होणारअसून त्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.गावाच्या कारभारात महत्त्व असलेल्या ग्रामपंचायतीच्या
निवडणुक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी शांततेतपार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यात ६८.२१टक्के मतदान झाले होते.
आज सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. ९ फेऱ्या
होणार असून त्यासाठी १२ टेबल लावण्यात येणार आहेत.एकावेळी एका ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण केली जाईल. तोनिकाल जाहीर केल्यानंतर दुसऱ्या ग्रामपंचायतीची मोजणी सुरूहोईल. रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या मतमोजणी९ फेऱ्यांमध्ये होणार आहे. त्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यातयेणार आहे. त्यामुळे सायंकाळी ४ वाजेपर्यंत बहूतांशतालुक्यातील मोजणी पूर्ण होईल. मंडणगड, लांजा, गुहागर या
तिन तालुक्यात कमी ग्रामपंचायती असल्यामुळे तिथे लवकरमोजणी होईल. मतमोजणीच्या ठिकाणीपोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी
केंद्रापासून १०० मीटर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले
आहे. त्यामुळे फटाके लावणे मिरवणुक काढता येणार नाही
www.konkantoday.com