संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार उघडकीस
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन चुकीच्या आणि अवैध पद्धतीने सूट देण्यात येत होती. हा प्रकार लक्षात येताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (बीएमसी) हे कृत्य करणाऱ्या दुय्यम अभियंत्यास तत्काळ निलंबित केले. या प्रकारची तातडीने चौकशी देखील सुरु करण्यात आली. याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यांसह एकूण ३ जणांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली
www.konkantoday.com