
राज्यात व देशात महागाई असली तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर खानपान सेवा स्वस्तात
राज्यात व देशात महागाई असली तरी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी बंगला या ठिकाणी खानपान सेवा कमालीची स्वस्त आहे. या दोन्ही बंगल्यांवरील मिळणाऱ्या खानपानाचे दर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बाहेर इतकी महागाई असताना कॅटरींग मालकाला इतकं स्वस्त जेवण देणं परवडत कसं ? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल.
वर्षा आणि देवगिरी बंगल्यावर चिकन बिर्याणी केवळ ११ रूपयांत, दही मिसळ केवळ १० रूपयांत, व्हेज सँडविच केवळ १० रूपयांत तर सुकामेवा केवळ १० रूपयांत मिळतोय. मुंबईतील बिगर तारांकीत, साध्या हॉटेलांमध्ये यापेक्षा सहा ते सात पट अधिक दर आहेत.विशेष म्हणजे, कंत्राटदार कंपनीला कुठल्याही पदार्थाच्या दरावर सबसिडी दिली जात नाही.
एकूण ४४ पदार्थ केवळ ११०० रुपयात पुरविण्याच्या अटीवर हे कंत्राट मे.सेंट्रल कॅटरर्स यांना देण्यात आली आहे.
www.konkantoday.com