
कशेडी घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७) कशेडी घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तब्बल २२ तासांनंतर दरड हटवून महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोरोना संकटामुळे नेहमीपेक्षा वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने कशेडी घाटातून नियमित प्रवास करणारे प्रवासी आहेत. वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्यांची पंचाईत झाली होती. एकेरी वाहतूक सुरू झाल्यावर त्यांनी परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी आशा व्यक्त केली.
www.konkantoday.com