क्रिकेटपटू कृणाल व हार्दिक पांड्या यांच्या वडिलांचे निधन
कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर शनिवारी दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त ANIने प्रसिद्ध केलं आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक माहितीत कळत आहे. कृणाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत आहे आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरात परतला. आता तो स्पर्धेत पुढील सामन्यात खेळणार नाही.
”पांड्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळे तो स्पर्धा सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन पांड्या कुटुंबीयांच्या दुखःत सहभागी आहेत,”असे बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शीशिर हट्टंगडी यांनी सांगितले.
www.konkantoday.com