रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दवाढीच्या विषयाला पुन्हा चालना मिळणार?
रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दवाढीच्या विषयाला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता आहे नुकतीच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी नगरपरिषदेला भेट दिल्यानंतर या विषयाला चालना मिळाली. जवळपासच्या १५ किमी परिघातील १५ ग्रामपंचायतींचा परिषदेत समावेश करून रत्नागिरीत ‘क’ दर्जाची महापालिका बनविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन ना हरकत मिळविला जाणार आहे.
पालिकेने आठ वर्षांपूर्वी हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केला होता. तसा प्रस्ताव पालिकेने १५ किमीच्या परिघात येणाऱ्या ग्रामपंचायतींना दिला होता पंरतु त्यावेळी ग्रामपंचायतीने विरोध केला होता
www.konkantoday.com