रत्नागिरी जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींमध्ये ९१४ प्रभागात मतदान सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींमध्ये ९१४ प्रभागात आज सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. ९१४ प्रभागातून ४३३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ९८६मतदान केंद्रांवर ४ लाख ५९ हजार १२१ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये २लाख ३७हजार ४९८स्त्री मतदार आणि २ लाख २१हजार ६१३ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रियेसाठी २२३ विभागीय अधिकारी, ११२५ केंद्र अध्यक्ष, ३३६५मतदान अधिकारी, १००४ शिपाई कार्यरत राहणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी १००४पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button