
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेनेआणखी काहीजणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी नुकताच केला आहे. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक नाव पुढे आलं आहे, ते म्हणजे मनसे नेते मनीष धुरी यांचं. धुरी यांनीही आपल्याला याच महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या एकाच महिलेने तीन राजकीय व्यक्तींना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेनं बदनामी करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.
www.konkantoday.com