
दापोली मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोणा, बंगाली, विद्या अशा पद्धतीचे प्रकार घडले -माजी आमदार संजयराव कदम
एकविसाव्या दशकाकडे जाताना ज्ञानाने इतकी प्रगिती केली आहे की घरबसल्या संपूर्ण जगाची माहिती मिळते. इतक्या मोठ्या स्वरूपात प्रगती झालेल्या या देशात आजही अंधश्रद्धा आपण पाळतो का याचे उत्तर सर्वसामान्य नाहीच असे येईल. परंतु दापोली मतदार संघात हे आजही सत्य आहे की येथे जादूटोणा, बंगाली, विद्या अशा पद्धतीची अघोरी पद्धत सुरू असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिल्याने मी थक्क झालो.असे माजी आमदार संजय कदम यांनी म्हटले आहे परंतु हे राजकीय हव्यासापोटी स्वतःला समाधान मिळावे यासाठीच केल्याचे दिसून आल्यामुळे मी या गोष्टीला फार महत्व देत नाही. कारण जनता सुज्ञ व सुशिक्षित आहे.
www.konkantoday.com