लोकप्रतिनिधी सरकार व जनतेमधील दुवा नाहीत, पालकमंत्र्यांच्या व खासदारांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह
सध्या नाणार येथील रिफायनरीवरून लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. नाणार प्रकल्पावेळी शिवसेनेने जनतेच्या बरोबर राहणार असल्याचे सांगून प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती. सध्या राजापूर परिसरातील विविध संघटना प्रकल्पाचे समर्थन करताना दिसत आहेत. या प्रकल्पग्रस्तांना आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसमोर मांडावयाची आहे. मात्र खासदार विनायक राऊत तसेच पालकमंत्री अनिल परब यांनी प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून संपर्क साधावा अशी भूमिका घेतली.
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करतेवेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख म्हणून भूमिका जाहीर केली होती. परंतु आता ते राज्याचे मुख्यमंत्री असल्याने राज्याचा प्रमुख म्हणून प्रकल्प समर्थकांची दुसरी बाजू ऐकून घ्यावी ही किमान अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी हे जनतेतून निवडून आलेले आहेत. सरकार व जनतेचा दुवा म्हणून त्यांनी काम करावे ही जनतेची अपेक्षा आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही लोकप्रतिनिधी ही भूमिका स्विकारण्यास नकार दिला आहे.
प्रकल्प ठेवायचा की नाही हा निर्णय सरकार स्वतःच्या अधिकारात घेऊ शकते. मात्र दुसरी बाजू ऐकून घ्यायची नाही हे लोकशाहीत कसे काय बसू शकते असा त्या परिसरातील जनतेचा सवाल आहे. विशेष म्हणजे आघाडीतील मित्र पक्षाचे नेते देखील या प्रश्नी मौनाच्या भूमिकेत आहेत.त्यांनी निदान आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत समर्थकांची बाजू मांडणे जरुरीचे आहे
www.konkantoday.com