डॉ.आनंद आंबेकर ए यु राष्ट्रीयस्तरावरील बँकेमार्फत ” ए यु युथ आयकॉन ” ने सन्मानित
शिक्षण, कला,क्रीडा, सामाजिक क्षेत्रात समाजाला आदर्शवत काम करणाऱ्या देशभरातील व्यक्तिंना युवक दिनानिमित्त ए यु बँकेतर्फे ” ए यु युथ आयकॉन ” या पदवीने सन्मानित करण्यात आले , डॉ.आनंद आंबेकर यांनी गेली 21 वर्ष गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी तसेच रत्नागिरी जिल्ह्य व मुंबई विद्यापीठातील युवकांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आदर्शवत काम केलं आहे. त्याचे अनेक विद्यार्थी विद्यापीठ ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चमकले आहेत आणि युवकांच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचे काम केले आहे तसेच नऊ वर्षे परिचारिकांच्या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे, या त्यांच्या अविरत निष्काम सेवेबद्दल ” ए यु युथ आयकॉन” या पदविने सन्मानित करण्यात आले.
ए यु स्मॉल फायनान्स बँक ही राष्ट्रीय स्तरावर 12 राज्यांमध्ये 697 ब्रँच असणारी अतिशय नावाजलेली बँक आहे , श्री संजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली 1996 पासून गेली 25 वर्ष अतिशय नावाजलेल्या बँकेतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी देशभरातील समाजाला आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचे काम करत आहे. रत्नागिरी शाखेचे ब्रँच मॅनेजर श्री गितेश जामसंडेकर यांनी डॉ.आनंद आंबेकर यांना बँकेच्या रत्नागिरी ब्रँचमध्ये सन्मानित केले त्यावेळी बँकेचे सहकारी उपस्थिती होते.
www.konkantoday.com