कोकण मार्गावर १५ पासून दोन फेस्टिवल स्पेशल रेल्वे
कोकण मार्गावर नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर चालवण्यात आलेल्या साप्ताहिक विशेष गाड्यांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर कोकण मार्गावर १५ जानेवारीपासून आणखी दोन फेस्टिवल स्पेशल नियमितपणे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव फेस्टीवल स्पेशलच्या दोन फेर्या नियमितपणे ३१ मार्चपर्यंत धावणार आहेत.
www.konkantoday.com