
कामथे उपजिल्हा रूग्णालयातील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू ठेवण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश
चिपळूण तालुक्यात कोरोनाचा रुग्ण वाढत असतानाच गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी वरदान ठरलेले कामथे उपजिल्हा रूग्णालयातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आल्याने रूग्णांची हेळसांड होत होती. याची गंभीर दखल घेत आमदार शेखर निकम यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची भेट घेत त्यांच्याकडे त्यांचे लक्ष वेधले. ना. टोपे यांनीही त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेवून हे कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्याचे आदेश उपसंचालकांसह रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
www.konkantoday.com