खाजगी लोकांसाठी करोना लसीची किंमत एक हजार रुपये राहणार
भारतात १६जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. भारत सरकारने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून १.१ कोटी डोस विकत घेतले आहेत. देशातील १३शहरांमध्ये ही लस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी सरकारला १० कोटी डोस २०० रुपयांमध्ये देणार असल्याचं सांगितलं आहे.
सरकारला २०० रुपयांच्या विशेष किंमतीमध्ये १० कोटी डोस देण्यात येणार आहेत. याबाबत सरकारकडून विनंती करण्यात आली होती. सर्वसामान्य, गरीबांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना आधार द्यायचा आहे. यानंतर आम्ही लशीची विक्री १ हजार रुपयांमध्ये प्रायव्हेटमध्ये करणार असल्याचंही सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.
www.konkantoday.com