
तुळसणी ग्रामपंचायतीला सरपंचानीच टाळे ठोकल्याने तालुक्यात खळबळ
संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी ग्रामपंचायतीला सरपंचानीच टाळे ठोकल्याने तालुक्यात खळबळ उडाली. ग्रामसेवकाच्या कारभाराला कंटाळून हा प्रकार झाल्याने आणि याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून तुळसणीच्या सरपंच सौ. सिद्धी लाड यांनी काल ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
www.konkantoday.com




