
रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आता तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संघटना सरसावल्या
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आता तालुक्यातील ४० ते ४५ विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संघटना सरसावल्या आहेत. या सर्व संघटना प्रतिनिधींची महत्वपुर्ण बैठक रविवारी राजापूरात पार पडली असून या बैठकीत रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी राजापूर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष अेड.शशिकांत सुतार यांची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाची रद्द केलेली अधिसूचना पुन्हा काढावी व हा प्रकल्प लवकरात लवकर राजापूरात राबवावा अशी मागणी केली जाणार असून तसे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. तर या प्रकल्पाच्या समर्थनासाठी पुढील १५ दिवसात समन्वय समितीच्या माध्यमातुन भेट घेण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
www.konkantoday.com