
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटकातील अंकोलानजीक भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक त्यांच्या गाडीला कर्नाटकातीलअकोंला जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे गाडीने प्रवास करीत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे
कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला.चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारला अपघात झाला. कारमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह चार व्यक्ती होत्या. अपघातानंतर जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
www.konkantoday.com