
कचरा व प्लास्टीक कचरा मुक्तीसाठी चिपळुणात स्वच्छ होम मिनिस्टर स्पर्धा
चिपळुणातील सह्याद्री निसर्गमित्र संस्था, हाऊ सायन्स इंटरनॅशनल व चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा व प्लास्टीक कचरा मुक्त चिपळूण ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच धर्तीवर खास महिलांसाठी स्वच्छ होम मिनिस्टर या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी दि. २६ जानेवारी २०२१ ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.
konkantoday.com