
अवैध मासेमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्याची मागणी
अनधिकृत मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात मासे टंचाई निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले असून अनुचित मासेमारी रोखण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष लवकरात लवकर स्थापन करण्यात यावा अशी शिफारस येथील मत्स्य व्यवसाय विभागाने वरिष्ठांकडे केली आहे.विविध प्रकारच्या अवैध मत्स्यमारीमुळे सध्या मासे मिळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. एलईडी दिव्यांच्या आधारे मासेमारी होत असून त्याला कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि या दिव्यांच्या आधारे मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे. विशिष्ट आसाच्या जाळ्यांच्या वापर करणे अनिवार्य ठरवण्यात आलेले असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा बर्याच कमी आकाराच्या आसाच्या जाळ्याचा वापर अनेक मच्छिमार करत आहेत. यामुळे आजवर एकदाही अंडी न घातलेले छोटे मासे जाळ्यात सापडून माशांचा निर्वंश होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत.www.konkantoday.com