इतिहासाचा साक्षीदार असलेला पूर्णगड किल्ला आता नव्या रूपात पर्यटकांसाठी सज्ज
पूर्णगड किल्ल्याच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या डागडुजीनंतर किल्ल्याचे रूपडे पालटले आहे. त्यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला पूर्णगड किल्ला आता नव्या रूपात पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे.
कोकणात गड किल्ल्यांचा मोठा वारसा लाभला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २४ किल्ले आहेत. किल्ले पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांसह अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु इतिहासाची आठवण करून देणारे किल्ल्याच्या डागडुजी न झाल्याने दुरावस्था झाली आहे. ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा यासाठी गड किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी पुरातत्व विभागामार्फत प्रयत्न करण्यात आले आहेत. किल्ल्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी सामाजिक संस्था दायित्व योजना राबविण्यात येत आहेत.
www.konkantoday.com