
लसीकरण मोहिमेसाठी सुयोग्य अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज
रत्नागिरी जिल्हयामध्ये तीन ठिकाणी कोविड १९ लसीकरण ड्रायरन मोहिम राबविण्यात आली. या कोविड १९ लसीकरण ड्रायरन मोहिमेमध्ये ७५ लाभार्थीची प्राथनिधिक स्वरुपात तालिम घेण्यात आली. यामुळे कोविड १९ च्या येऊ घातलेल्या लसीकरण मोहिमेसाठी सुयोग्य अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे .
रत्नागिरी जिल्हयामध्ये सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी , उपजिल्हा रुग्णालय दापोली व प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा अशा एकुण तीन ठिकाणी कोविड १९ लसीकरण ड्रायरन मोहिम राबविण्यात आली
www.konkantoday.com