
लांजा शहरात ब-याच दिवसांनी चोरट्याने डोके वर काढले,सदनिकेचे कुलूप तोडून सोने आणि रोख रक्कम मिळून सुमारे तीन ते चार लाख रूपये किंंमतीचा ऐवज लंपास.
लांजा शहरात भर दिवसा रॉयल पार्क कॉम्प्लेसमध्ये अज्ञात चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील चार तोळ्याचे सोने आणि रोख रक्कम मिळून सुमारे तीन ते चार लाख रूपये किंंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.लांजा शहरात ब-याच दिवसांनी चोरट्याने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चोरांची भिती वाढली आहे. शहरातील रॉयल पार्क या इमारतीत रूहीदा हनीफ नेवरेकर यांची तिस-या मजल्यावर सदनिका आहे. एकट्याच घरात असल्याने सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घरचा दरवाजा बंद करून त्याच इमारतीमध्ये असलेल्या नातेवाईक यांच्याकडे गेल्या होत्या. परत आल्यावर दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले तसेच घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, बांगड्या अंगठ्या व रोख बारा हजार असा ऐवज चोरट्याने चोरून नेले