
लांजा शिक्षण विभागात मेडिकलसाठी ५५ लाख रुपयांची खोटी बिले, १०९ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा
लांजा शिक्षण विभागात मेडिकल बिलासाठी ५५ लाख रुपयांसाठी खोटी बिले सादर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी १०९ प्राथमिक शिक्षकांना गटविकास अधिकार्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या तुलनेने लांज्यातून मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची मेडिकल बिले खर्ची टाकण्यात आली आहेत. प्राथमिक शिक्षकांनी शासन निर्णय तरतुदीनुसार अनुज्ञेय नसणारी मेडिकल बिले सादर करून कार्यालयाची दिशाभूल केल्याचा ठपका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने नोटीस बजावलेल्या शिक्षकांवर ठेवला आहे.शासकीय रूग्णालय बाह्य रूग्ण उपचारांसाठी प्राप्त झालेल्या देयकांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये टॉनिक्स, ऍसिडीटीच्या गोळ्या, टॉनिकच्या कॅप्सूल, रक्तवाढीच्या गोळ्या, पॅरासिटामॉल ऍण्ड टी-बायोटीक मेडिसीन कन्सलटेशन फी कॅल्शियम गोळ्या, कफ सिरप, हर्बल प्रॉडक्ट, ट्रिपल एक्स चार्जेसची खाजगी हॉस्पिटलची बिले सादर करण्यात आली आहेत. www.konkantoday.com