अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांच्या झालेले नुकसानी बाबत आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांना निवेदन दिले
कोकणामध्ये झालेल्या अवकाळी मुसाळधार पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले असुन तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळणेबाबत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवीह्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना.दादाजी भुसे यांना निवेदन दिले. कोकणामध्ये ओक्टोंबर पर्यंत लांबलेल्या व त्यानंतर मोहोर येण्यास पोषक वातावरण नसल्याने म्हणजेच थंडी न पडल्यामुळे ब-याच भागात मोहोर धारणा उशिरा झाली होती. परंतु नव्या वर्षाच्या सुरवातीलाचा अवकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजू वरील मोहर गळुन गेला असुन तुडतुडा व करपा रोगामुळे आंबा व काजूचे मोठयाप्रमाणात नुकसान झाल्यामुळे बागायतदारांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना.दादाजी भुसे यांना निवदेन दिले असुन अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करुन लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई अनुषंगाने संबंधीताना मिळण्याबाबत विनंती केली.
www.konkantoday.com