
रत्नागिरी मजगाव रोड येथे स्वरुप फ्युएल स्टेशनचा शुभारंभ नामदार उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी मार्गावर येथे राजेश देवळेकर व कुटूंबियांच्या स्वरुप फ्युएल स्टेशनचा (रत्नागिरी) उद्घाटन समारंभ मंत्री महोदय उदयजी सामंत यांच्या हस्ते पार पडला यावेळी, जेष्ठ उद्योजक आणि मंत्री महोदय उदयजींचे जेष्ठ बंधू किरण उर्फभैय्या सामंत, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, सभागृह नेते राजन शेटे, उर्मिलाताई घोसाळकर, देवळेकर परिवार व मित्रमंडळी उपस्थित होते.
फ्युएल पम्प कॅम्पसचे उदघाटन उदयजींच्या हस्ते झाले तर फ्युएल पम्प मशीनचे उदघाटन अनुक्रमे किरणशेठ आणि उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी देवळेकर कुटुंबीयांनी तीनही सिद्धहस्त यशस्वी मान्यवरांकडून उद्घाटन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी मान्यवरांनी देवळेकर यांच्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com