
भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत राडा केला ,फलकांना काळं फासलं
भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल शिर्डीत राडा केला या कार्यकर्त्यांनी साई मंदिर आवारातील ड्रेसकोड विषयीच्या फलकांना काळं फासलं आहे. या प्रकरणी ३ महिला कार्यकर्त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी फलकांना काळं फासणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच लवकरात लवकर हे फलक काढावेत, नाहीतर काकड आरतीला पैसे घेण्याचा मुद्दा असो किंवा भक्तांना आध्यात्मिक शिक्षा देण्याचा प्रश्न असो किंवा ड्रेसकोडचा प्रश्न असो, यावर भूमाता ब्रिगेड आता आणखी आक्रमक होणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.ccom