
चिपळूण शहरातून बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह एकाच ठिकाणी सापडल्याने खळबळ
चिपळूण ः चिपळूण शहरातून बेपत्ता झालेल्या वृद्ध व तरूणीचा मृतदेह भोईवाडा परिसरातील धक्क्याजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
खेर्डी माळेवाडी येथे राहणारी अल्पिया किलनीय ही २१ वर्षाची तरूणी घरातून कोणालाही न सांगता तीन दिवसांपूर्वी निघून गेली होती. तिचा शोध घेण्यात येत होता. याबाबत तिचे वडिल मुन्ना किलनीय यानी पोलीस स्थानकात तक्र्रारही दिली होती. त्याचप्रमाणे चार दिवसांपूर्वी वालोपे येथील पांडुरंग तांबीटकर हे ६५ वर्षाचे वृद्ध घरातून न सांगताच निघून गेले होते. सायंकाळी मुलगा घरात आल्यानंतर त्याला पांडुरंग हे घरी आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.
विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या या दोघांचेही मृतदेह करंबळे खाडीतील भिले भोईवाडी या धक्क्याजवळ आढळून आले.