कुडाळ शहरात १ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त,चारजणांविरुध्द गुन्हा दाखल

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ शहरातील क्रांती सिरॅमिक दुकानासमोर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी कुडाळ शहरातील एका व्यापार्‍यासह चार जणांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये १ लाख ६८ हजारांचा गुटखा व १४ लाख रुपये किंमतीचा ट्रक व टेम्पो असा १५लाख ६८हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी केली.गुटखा भरलेला ट्रक व टेम्पो बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक करत होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button