
रात्रीची संचारबंदी बुधवारपासून मागे घेण्याच्या हालचाली सुरू
ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांत सापडलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पाश्र्वभूमीवर राज्यात ५ जानेवारीपर्यंत लागू करण्यात आलेली रात्रीची संचारबंदी बुधवारपासून मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यातील करोनास्थिती सध्या नियंत्रणात असल्याने रात्रीची संचारबंदी वाढविण्यात येणार नसली तरी उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांसाठी खुली होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
www.konkantoday.com