रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले आहे. दि. ६ जानेवारी पत्रकार दिनी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघामार्फत गेली अनेक वर्ष पत्रकार दिनी पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्कार देऊन पत्रकारांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो . यावर्षी ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव यांना पत्रकार सन्मान पुरस्कार तर केटीव्हीचे वृत्त संपादक अलिमियाँ काझी यांना पत्रकार गौरव पुरस्कार, केटीव्हीचे कॅमेरामन सचिन बोरकर यांना व्हिडिओ जर्नालिस्ट गौरव पुरस्कार, दैनिक सागरच्या मीरा शेलार यांना पत्रकार भूषण पुरस्कार, रत्नागिरी नगर पालिकेच्या वाहन विभागाचे प्रमुख जितेंद्र विचारे यांना पत्रकार मित्र सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय महाडिक, अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपध्याक्ष निलेश जगताप, मेहरून नाकाडे , सचिव राजेश कळंबटे यांच्यासह सर्व पदाधिकारी , सदस्यांनी केले आहे.
www.konkantoday.com