रत्नागिरी चे सुपुत्र कैलास दामले यांचे पखवाज वादनात सुयश
क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे घेण्यात आलेल्या युवा महोत्सवात आपल्या रत्नागिरी चे सुपुत्र कैलास दामले यांनी पखवाज वादनात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही राज्यस्तरीय फेरी काल पार पडली.यापूर्वी याच स्पर्धेत जिल्हा व विभाग स्तरावर त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यानंतर त्यांची निवड राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी झाली होती.यात कैलास दामले यांनी दुसरा क्रमांक पटकावुन सुयश प्राप्त केलं.
www.konkantoday.com