
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलीय.काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद हे भाजपला देण्यास सेना तयार झालीय, असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय. त्यालाच आता शिवसेनेचे नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा, अशा इशारा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांनी रवी राजांना दिलाय.
www.konkantoday.com