मुंबईत २६ वर्षीय तरुणाने तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली
मुंबईत डोक्यावर गोळी झाडून तरुणीची हत्या करण्यात आली आहे. २६ वर्षीय तरुणाने तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सोमवारी मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या मागे रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ माजली आहे.
दोघांचीही ओळख पटली असून राहुल यादव आणि निधी मिश्रा अशी त्यांची नावं आहेत. राहुल हा कांदिवलीचा तर निधी मालाडची रहिवासी होती.निधी मिश्राचा दुसऱ्या एका व्यक्तीसोबत साखरपुडा झाला होता. याच कारणामुळे राहुलने तिच्यावर गोळीबार करुन हत्या केली असावी,” असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com