जिल्ह्यात अनेक ठिकाणी आठवडा बाजार सुरू, मात्र रत्नागिरीत आठवडा बाजार सुरू करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी काेराेनाचे नियम पाळून आठवडा बाजार सुरू झाले आहेत मात्र रत्नागिरीतील आठवडा बाजार सुरू करण्याच्या निर्णयाकडे पालिकेतील सत्ताधार्यांसह मुख्याधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्राहक, व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने शासन निर्णयानुसार आठवडा बाजार बंद करण्यात आले होते. राज्य शासनाने अनलॉक अंतर्गत आठवडा बाजार सुरू करण्यास काही अटी, शर्तींवर रितसर परवानगी दिली आहे. तरीही पालिकेने आठवडा बाजार अद्यापपर्यंत सुरू केलेला नाही, नगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या पूर्णतः कमी झाली आहे. यामुळे रत्नागिरीतील आठवडा बाजार सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे
www.konkantoday.com