जनसुनावणीतून बहुसंख्य लोकांची एखाद्या प्रकल्पाबाबत भावना लक्षात येते -खा. सुरेश प्रभू
लोकांना जे हवं ते आपण दिले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. आपण पर्यावरणमंत्री असताना सन १९९८ मध्ये जनसुनावणीची तरतूद केलेली होती. जनसुनावणीतून बहुसंख्य लोकांची एखाद्या प्रकल्पाबाबत भावना लक्षात येते त्याचवेळी ग्रामीण भागातील जनतेला अपेक्षित असलेला विकास आपण केलाच पाहिजे असे मत माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
www.konkantoday.com