
कमी डिझेल देण्याच्या परिपत्रकामुळे मच्छिमार व्यावसायिक अडचणीत येणार
डिझेल कोटा निम्मा झाल्याने मच्छिमार संकटातराज्यातील प्रत्येक मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी देण्यात येणारा डिझेल कोटा १५ दिवसांसाठीच सुमारे चार हजारां ऐवजी फक्त १७५० लीटर देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत. याआधीच मच्छिमारांना डिझेल परताव्याची सुमारे २३० कोटी थकबाकी देण्यात शासनाकडून होणार्या दिरंगाईमुळे राज्यातील लाखो मच्छिमार पुरता आर्थिक संकटात सापडला असतानाच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कमी डिझेलमुळे मच्छिमारांना मासेमारी व्यवसाय करणे आणखी अवघड होवून बसणार आहे.
www.konkantoday.com