
हातखंब्यातील संबोधि महिला मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची 190 वि जयंती उत्साहात साजरी..!!
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी , स्फुर्तीनायिका, क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सर्व प्रथम सावित्रीमाई यांच्या प्रतिमेस मंडळाच्या अध्यक्षा मनीषा कांबळे यांनि पुष्पहार अर्पण केला व सुजाता कांबळे यांनी दीपप्रज्वलन करून सामुदायिक बुद्धवंदना घेत उपस्थितांना पेढे वाटून तोंड गोड करण्यात आले. यावेळी अनेकांनी क्रांतीज्योती सावित्रीमाईचा धगधगता आणि संघर्षमय प्रवास सांगून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमात खास पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विध्यार्थी आंदोलन संघटनेचे तालूका सचिव अमर पवार त्यांच्यासोबत प्रणाली बैकर ,चंद्रमनी सावंत प्रज्वल कांबळे उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमात सहभागी झालेले कमिटीचे पदाधिकारी अनंत कांबळे, गोविंद कांबळे, महेंद्र कांबळे , गोविंद कांबळे, सुनील कांबळे, नंदिनी कांबळे, नितीन कांबळे, शालिनी कांबळे, अमोल कांबळे, मोनिष कांबळे, रोहित कांबळे, सुजल कांबळे ,सम्यक कांबळे, स्वराली कांबळे, दीपेश कांबळे, आर्यन कांबळे, दीपाली कांबळे, दिनेश कांबळे ,अक्षय वालकर मनीष कांबळे, तेजस कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन राजेंद्र कांबळे यांनी केले.
राजेंद्र कांबळे यांनी आंबेडकर चळवळ तरुण युवकांनी नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या पाठीशी ढालीसारखे उभे आहोत, असे तरुण युवकांना आव्हान केले.